पनवेल : अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे सार्वजनिक नवरात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. नवीन पनवेल मधील सीकेटी विद्यालयाच्या पटांगणात ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव साजरा होणार असून या उत्सवात सहभागी होणाऱ्या विजेत्यांना दरदिवशी ५० बक्षिसे असणार आहेत.
गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून रविवार ६ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता भोंडला असणार आहे. तर शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५ वाजता देवीच्या मुर्तीचे विसर्जन होणार आहे. या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका सुशीला घरत, वैद्यकीय सेलच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता घरत आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
