मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पोईसर जिमखाना, कांदिवली पश्चिम येथे पार पडली. या सभेमध्ये मुंबई उपनगरच्या १०० पेक्षा जास्त सभासदांचा सहभाग होता.
या सभेत मल्लखांब खेळाच्या व संघटनेच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी मल्लखांब खेळचे महत्व वाढवण्यावर विचारविनिमय केला आणि योग्य निर्णय घेतले.
मल्लखांब खेळातील द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गणेश देवरुखकर , २री विश्व मल्लखांब स्पर्धेतील विजयी खेळाडू जान्हवी जाधव , अक्षय तरळ, उपविजेती रुपाली गंगावणे यांना सन्मानीत करण्यात आले.
यावर्षीपासून, उपनगर संघटनेने कै. दत्ताराम दुदम (शिव छत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या स्मरणार्थ १४ वर्षांच्या वयोगटातील एक मुलगा (विराज आंब्रे.) व एक मुलगी (तन्वी दवणे.) यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात केली. या पुरस्कारासोबतच रोख ५,०००/- रुपये शिष्यवृत्ती ही देण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभ ॲड. प्रतिभाताई गिरकर (मा.नगरसेविका) यांच्या हस्ते करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष- करुणाकर शेट्टी, कार्यवाह -आशिष देवल, कार्याध्यक्ष- गणेश देवरुखकर, कार्याध्यक्ष महेंद्र चेंबूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा यशस्वीपणे संपन्न झाली.
