मुंबई : ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने येत्या ८ आणि ९ ऑक्टोबरला चर्चगेट येथील ओव्हल मैदानात १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. १ सप्टेंबर २०१० नंतर आणि १ सप्टेंबर २०१३ पूर्वी जन्म झालेली मुले या निवड चाचणीसाठी पात्र ठरणार असून सर्व पात्र खेळाडूंनी आपल्या जन्माच्या दाखल्यासह संपूर्ण पांढऱ्या गणवेशात वरील दिवशी दुपारी ३.०० वाजता ओव्हल येथील अकादमीच्या मैदानात उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अकादमीचे प्रशिक्षक अमित जाधव यांच्याशी ९८९२६००१५५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
