ठाणे, : भाजपाचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा प्रमुख व माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जोपासत विधायक उपक्रमांतर्गत कोपरीतील शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सीसीटीव्ही भेट दिले आहेत. भरत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. यापुढील काळात कोपरीतील प्रत्येक शाळेला सीसीटीव्ही भेट देण्याचा संकल्प केला आहे.
तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी परिसरातील नागरिकांसाठी सातत्याने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि धार्मिक उपक्रम राबविले जातात. या भागातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन मदतीचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरीतील शाळांना मोफत सीसीटीव्ही भेट देण्यात आले. या शाळांमधील मुला-मुलींची सुरक्षितता ध्यानात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. भरत चव्हाण व भाजयुमोचे सचिव ओमकार चव्हाण यांच्या हस्ते शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सीसीटीव्ही प्रदान करण्यात आले. यापुढील काळात कोपरीतील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्पही भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडून करण्यात आला. या वेळी भावना चव्हाण यांचीही उपस्थिती होती.
0000000000
