ठाणे : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमताकडे वाटचाल सुरू केल्यावर ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ठाणे शहरात विजयी जल्लोष केला. भाजपाच्या वर्तकनगर येथील कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. हरियाणात सुरू झालेली विजयाची घोडदौड महाराष्ट्रातही कायम राहील, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला.
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू झाली. त्यानंतर भाजपाच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सवात भाजपाचे पदाधिकारी, विविध प्रकोष्टचे प्रमुख, मंडल पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
00000
