सलमान पठाण :
ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट मधील इंदिरानगर येथे समाजसेवक बबलू दादुभाई शेख यांच्या दादुभाई प्रतिष्ठान तर्फे 9 एप्रिल रोजी दावत ए इफ्तार या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
दादू या प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत तर पार्टीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दादूभाई प्रतिष्ठान इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतो आनंद दिघे च्या काळापासून सुरुवात झालेली ही इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम सर्व धर्म समभाव आणि धार्मिक एकात्मतेच्या संदेश देत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.मागच्या 35 ते 40 वर्षापासून मी नगरसेवक होतो तेव्हापासून ते मी मुख्यमंत्री आहे आज पण मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो.माझ्या मतदारसंघातल्या मुस्लिम बांधवांच्या प्रेमाखातर मी दरवर्षी रमजान महिन्यात येथे येत असतो तसेच आम्ही सर्व जण मिळून मिसळून हिंदू मुस्लिम सन उत्सव साजरे करत असतो. आणि तसेच सर्व मुस्लिम बांधवांना माझ्याकडून रमजान ईद च्या ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा.
या इफ्तार पार्टीला आ. रवींद्र फाटक,ठाणे महानगरपालिका माजी महापौर नरेश म्हस्के ,नगरसेवक एकनाथ भोईर,मीनल संखेत, दशरथ यादव,दीपक बेतकर, समजसेवक महेंद्र सोडारी, राजकुमार यादव, दिनेश शेट्टी,दिनेश मलपे,राम रेपाळे, हाजी इलियास बदर मस्जिद चे इमाम हा. तन्वीर यांची उपस्थिती होती. दादूभाई प्रतिष्ठानचे बबलु दादुभाई शेख, वसीम दादूभाई शेख, आणि इम्रान दादूभाई शेख यांनी ह्या कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे केलं होत.
