ठाणे : यंदाच्या दिवाळी आधीच राज्यातील २ कोटी ३० महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी बोनस दिलाय. लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा ३००० रुपयांचा हप्ता जमा अॅडव्हान्स जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

काही लोक म्हणत होते की, आचार संहितेपूर्वी या योजना बंद पाडू. आमची देण्याची वृत्ती आहे, आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे राहणारं सरकार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. खोडा घालणारे कुणीही येउद्या ही लाडकी बहीण योजना सुरुच राहणार

आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एका क्लिकवर जमा केले आहेत. आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, हफ्ते घेणारे सरकार नाही असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांची तोंड आता काळी झाली आहेत. आशाताई भोसले यांनी देखील विरोधकांना चांगली चपराक दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. खोडा घालणारे कुणीही येउद्या ही लाडकी बहीण योजना सुरुच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनेक योजना यशस्वी राबवण्याची  सरकारने जबाबदारी घेतली आहे. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्या शिवाय राहणार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते रागयडमध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या. २ कोटी ३० लाख बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत. जवळपास १७००० कोटी रुपयांचे वितरण सरकारनं लाडक्या बहिणींना केलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमची देण्याची वृत्ती आहे. ही योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार अॅडव्हान्समध्ये देणारं सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेमुळं विरोधकांची तोंड काळी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *