बस दरीत २० फुट घसरली ०सहा जखमी

रायगड :   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्पा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जाणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बसचा अपघात झाला. बस वीस फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात सहा महिला प्रवासी जखमी झाल्या असून जखमींवर उपचार सुरु आहेत.

माणगावमधील धनसे क्रीडांगणावरील सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या शेकडो बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना एका बसचा घाटात अपघात  झाला.यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत. ही बस म्हसळा येथून माणगावकडे येतं असताना बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सुदैवाने या अपघातामध्ये कोणीतीही जीवीतहानी झालेली नाही. एसटी घेऊन गेलेलं चालक हे नवीन असल्यानं मुख्य वळणावरिल हा अंदाज न आल्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

One attachment • Scanned by Gmail

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *