मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेच्या आदित्य ठाकरेंना कडवी लढत देण्यासाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख मंगेश कसालकर उपस्थित होते.
