गुढीपाडव्याला दुर्दैवी घटना!
विरार : विरारमध्ये एका खासगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे विरार परिसरात शोककळा पसरली आहे. मंगळवार सकाळी साडेअकराच्या सुमारास विरारमध्ये हा प्रकार घडला. ग्लोबल सिटी येथे रुस्तमजी शाळेच्या बाजूला प्लांटमध्ये हा प्रकार घडला. साफसफाईसाठी खासगी कंपनीचे चार मजूर खाली उतरले होते. यावेळी एक मजून प्लान्टमध्ये पडला त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन मजूर उतरले. ते वर न आल्याने आणखी एक मजूर खाली उतरला. मात्र या चारही मजूरांचा मृत्यू झाला आहे.
शुभम पारकर (28) निखिल घाटाळ (24) सागर तेंडुलकर (29) आणि अमोल घाटाळ अशी मृत कामगारांची नावे आहेत. ग्लोबल सिटीमधील १२४ इमारतींचा हा एसटीपी प्लांन्ट आहे. या साफसफाईची जबाबदारी पॉलीकॅप या कंपनीला दिली होती. वसई-विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. अर्नाळा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. ऑक्सीजन सिलेंडरचा वापर करून पाण्याच्या टाकीतून आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अद्याप एकाचा शोध सुरु आहे.
