कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धा
मुंबई : द.आफ्रिका येथे सन सिटी या शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर१ (४० वर्षावरील पुरुष) या गटात 75 किलो वजनी गटात रायगडच्या “दिनेश हरिचंद्र पवार’यांनी सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिम मध्ये सराव करतात. यापूर्वी सुद्धा त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकली आहेत. दिनेश पवार यांच्या यशात त्यांच्या मातोश्री गीता हरिचंद्र पवार आणि पत्नी रेशमा दिनेश पवार यांचा देखील मोठा वाटा आहे.
पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष गिरीश वेदक यांनी पवार यांचे खास अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय प्रतापराव सरदेसाई यांचे सुद्धा मार्गदर्शन पवार यांना मिळाले.
००००
