दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर
मुंबई : महाराष्ट्र भर दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमांना दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरवात होत असते. मुंबई जवळील बेलापूरच्या किल्यावर श्री वाघजाई माता सांस्कृतिक क्रिडा मंडळ,प्रभादेवी आणि शिव भक्तांच्या वतीने शिवप्रतिमा,शस्त्र पूजन व शिव मंदिराला दसरातोरण बांधून या कार्याची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी मुंबईच्या एवढ्या जवळ असूनही किल्ल्याची झालेली दुरावस्त पाहता किल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असून लवकरच या ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान,शिव प्रारंभ प्रतिष्ठान,मावळे आम्ही स्वराज्याचे,या संस्था व रोहित देशमुख, जयवंत निकम,राज मोरे,अमोल कदम,अजित कारके, किरण भोसले,कुलदीप धुमाळ,सुरज कदम आणि मोठया संख्येने शिव प्रेमी मावळे उपस्थित होते.
००००००००००००००