शिवसेना २१ काँग्रेस १७ राष्ट्रवादी १०
स्वाती घोसाळकर
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत मोठा भाऊ उध्दव ठाकरेंची शिवसेनाच असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगलीच्या जागेसह शिवसेना लोकसभेच्या ४८ पैकी २१ जागा लढणार आहे. तर
काँग्रेस १७ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार आहे. गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी शिवालयात पत्रकार परिषद घेत लोकसभेच्या निवडणूकीचे रणशिंग फुंकले. सांगलीची जागा जशी ठाकरेंच्या शिवसेनेने हक्काने मिळवली तशीच भिवंडीची जागाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसकडून खेचून घेतली. हायकंमांडाच्या आदेशाचे पालन करीत हे कटू निर्णय राज्य काँग्रेसने घेतल्याचे समजते. मुंबई-उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ मात्र काँग्रेसकडे राहणार आहे.
पक्षनिहाय जागा वाटप झालेले मतदार संघ पुढीलप्रमाणे
शिवसेना (उद्धव ठाकरे)
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे,रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकलंगणे, संभाजीनगर, शिर्डी,सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य
काँग्रेस
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली -चिमूर, चंद्रपूर, नांदेड,जालना, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, मुंबई-उत्तर, मुंबई-उत्तर मध्य
राष्ट्रवादी (शरद पवार)
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
