मुंबई : मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालावर आधारित ‘जिंकणार कोण? अंदाज आपला’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक अंदाजासाठी प्रथम क्रमांक रुपये ५०००/, द्वितीय क्रमांक रुपये ३०००/-, तृतीय क्रमांक रुपये २०००/- अशी ३ पारितोषिके आहेत. या स्पर्धेसाठी पुढील नियम ठरविण्यात आले आहेत. – १) एकापेक्षा जास्त उत्तरे अचूक आल्यास चिठ्ठी टाकून ३ विजेते निवडण्यात येतील. २) ही स्पर्धा विनामूल्य असून फक्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांसाठीच आहे. ३) निकालाबाबतचे सर्वाधिकार निवड समितीकडे असतील.
स्पर्धकांनी मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या election.mmps@gmail.com या ईमेलवर किंवा सोबत दिलेला फॉर्म भरून आपला अंदाज पाठवावा. अधिक माहितीसाठी कार्यवाह शैलेंद्र शिर्वेâ (९९८७०६३६९९) आणि कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर (८७७९२८९३३६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले आहे.
पुढील लिंकवर जाऊन आपली माहिती भरा. https://forms.gle/CW3zHMvNBCVE5MMC9