अशोक गायकवाड
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल, अशी कृती करणे यावर निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी / उपविभागीय अधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे या बाबींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहीता, २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन त्यांनी निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशात म्हटले आहे.
0000