ठाणे : आनंदीबाई केशव जोशी विद्यालयाच्या ८ वर्षीय हर्षिता विनायक ठोंबरेने तिरंदाजीत चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हिंगोली येथे नुकत्याच झालेल्या सातव्या महाराष्ट्र राज्य मिनी तिरंदाजी स्पर्धेत आपल्या वयाच्या दोन वर्षे मोठ्या वयोगटाच्या पारंपरिक भारतीय तिरंदाजी स्पर्धेत लक्ष्यवेध करताना हर्षिताने तिसरे स्थान मिळवले. त्याआधी कल्याण येथे जगन्नाथ (अप्पासाहेब) शिंदे क्रीडा गौरव समिती आणि ठाणे जिल्हा आट्यापाट्या संघटना आयोजित विविध खेळांच्या पहिल्या ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सवात हर्षिताने आपल्या वयोगटात पहिले स्थान मिळवत सर्वांना आपली दखल घ्यायला लावली होती. हर्षिता कान्हा आर्चरी ट्रेनिग सेंटरमध्ये श्रीमंत कळणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा कसून सराव करते.  हर्षिताच्या या यशाबद्दल शाळेच्या समन्वयिका अंजना कपूर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *