ठाणे : ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटना आणि अमित नांदगावकर आयोजित रमेश नांदगावकर आणि रत्नप्रभा रमेश नांदगावकर स्मृती ठाणे जिल्हा नॅचरल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत सहाव्या गटातील युनिव्हर्सल फिजिक सेंटरच्या मोहम्मद सालेमउद्दीनने इतरांना मागे टाकत किताबावर आपले नाव कोरले.
ब्राम्हण शिक्षण मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्हातील १०० हुन अधिक शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. नैसर्गिक शरीरसंपदेला महत्व मिळावे म्हणून आयोजित केलेल्या पाचव्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत चांगली चुरस अनुभवायला मिळाली.यात मोहम्मदला स्वतःच्या सहाव्या गटात दुसऱ्या स्थानी राहिलेल्या प्रमोद वाजे, सातव्या गटातील विजेता आदित्य मसुरकर यांच्याकडून चांगली लढत मिळाली. पण त्यात मोहम्मदने विजेतेपद संपादन केले.यावेळी अमित नांदगावकर, ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटनेचे अध्यक्ष विनायक केतकर आणि इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल : गट पहिला – नीरज फर्डे (सुनील भारती व्यायामशाळा), गौरव जाधव (फिट अँड फाईन फिटनेस जिम), प्रेमकांत जाधव (सुनील भारती व्यायामशाळा),
गट दुसरा : क्रिश गुप्ता ( फिट अँड फाईन फिटनेस जिम), स्वप्नील बांदल (गॅलक्सी फिटनेस), सार्थक पितांबरे (सुनील भारती व्यायामशाळा).
गट तिसरा : नितेश मिश्रा (गॅलक्सी फिटनेस) , फकीर अली अहमद ( युनिव्हर्सल फिजिक सेंटर), विवेक विशे (एबीएस स्टुडिओ).
गट चौथा : शेख मोहम्मद शातीर अहमद ( युनिव्हर्सल फिजिक सेंटर), अनिल लाड ( फिट अँड फाईन फिटनेस जिम ) मेहुल म्हात्रे ( एबीएस स्टुडिओ) .
गट पाचवा : अक्षय भोईर (युनिव्हर्सल फिजिक सेंटर) सुधीर चौधरी, सागर चौधरी (दोन्ही ऑस्टिन फिटनेस)
गट सहावा : मोहम्मद सालेमउद्दीन (युनिव्हर्सल फिजिक सेंटर), प्रमोद वाजे (स्फूर्ती व्यायामशाळा ), करण मढवी (वन मोर जिम अँड फिटनेस )
गट सातवा : आदित्य मसुरकर (ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन),अभिषेक राठोड, धीरज सरोज ( दोन्ही गॅलॅक्सी जिम).
0000
