रोटरी क्लब रॅपीडो कॅरम स्पर्धा
मुंबई : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आयोजित तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व रोटरी भवन, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबई उपनगरच्या रिझवान शेख तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या मधुरा देवळेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन शनिवार दिनांक २६ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता करण्यात येईल. यानंतर पुरुष एकेरी गटाने सामन्यांना सुरुवात होईल. तर महिला एकेरी गटाचे सामने २७ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळविण्यात येतील. महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या सामान्यांचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय विजेत्या खेळाडूंना रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे.
पुरुष एकेरी : १) रिझवान शेख (मुंबई उपनगर ), २) योगेश परदेशी ( पुणे ), ३) विकास धारिया ( मुंबई ), ४) सागर वाघमारे (पुणे), ५) झैद अहमद फारुकी ( ठाणे ), ६) संजय मांडे (मुंबई), ७) पंकज पवार ( ठाणे), ८) महम्मद घुफ्रान ( मुंबई )
महिला एकेरी : १) मधुरा देवळे ( ठाणे ) २) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) ३) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग ), ४) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ५) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ६ ) उर्मिला शेंडगे ( मुंबई ), ७) अनिता कनोजिया ( रायगड ), ८) संगीता चांदोरकर (मुंबई )
००००
