मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर
उल्हासनगर – महानगरपालिकेने उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कंबर कसली असून त्याकरिता शहरातील 4 नामचिन कॉलेज व डॉक्टरांवर जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आयुक्त विकास ढाकणे, स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी स्थायी समिती सभागृहात विधानसभा निवडणूकित जनजागृतीची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यात चांदीबाई कॉलेज, आरकेटी कॉलेज,एसएसटी कॉलेज आणि वेदांत कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासह सहायक आयुक्त विशाल कदम, मयुरी कदम,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग अधिकारी, समाजसेविका उपस्थित होते.
या बैठकीत विकास ढाकणे, किशोर गवस यांनी सर्व सदस्यांनी निवडणुक जनजागृती निमित्ताने विविध लक्षवेधक नियोजन करून त्याप्रमाणे जास्तीत जास्त परिणामकारक उपक्रम राबवून महापालिका क्षेत्रातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश उपस्थितांना दिले.
यासोबतच महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याकडूनही मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली असून शालेय विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
0000
