मुंबई : वास्को -गोवा येथील रवींद्र भवन येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्ट्र संघाने शानदार कामगिरी करताना विविध गटातील तब्बल चौदा‌‌ सांघिक जेतेपद मिळवली.. ही स्पर्धा पॉवरलिफ्टिंग इंडिया आणि गोवा सुपर बॉडीज पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

या क्लासिक बेंच स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनियर, आणि मास्टर्स पुरुष व महिलांच्या गटात आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. महाराष्टाच्या अनेक पुरुष व महिला

खेळाडूंनी या स्पधैत भरघोस पदकांची कमाई केली. . त्यामुळेच महाराष्ट्र संघाला एकूण 14 सांघिक विविध गटातील विजेतेपद मिळाली. .

महाराष्ट्राच्या या शानदार कामगिरी बाबत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई ,राज्य संघटनेच्या उपाध्यक्षा ,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त “रक्षा महाराव” यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे खास अभिनंदन केले आहे. या सर्व खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनंत चाळके, सूर्यकांत गद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. संघाचे व्यवस्थापक अरुण पाटकर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *