मिरा भाईंदरमधील 145 या मतदारसंघातून पहिला फॉर्म अपक्ष उमेदवार हंसू कुमार पांडे यांनी भरला.

 

मिरा भाईंदर : 145 विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार हंसू कुमार पांडे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. पुढे ते म्हणाले की मिरा भाईंदर व्यापारी संघटनेचा मी उपाध्यक्ष असल्याने इथल्या गुजराती मारवाडी असा सगळ्या समाजाचा मला पाठींबा आहे आणि मी निवडून येणारच .

नगरसेवक असताना गेल्या पंधरा वर्षात लोकांसाठी बरीच कामं केल्याचा दावा त्यांनी केला. समोर कितीही मोठा धुरंदर उभा असू दे यावेळी लोकांचा पाठींबा मला मिळणार आणि मी निवडून येणारच . असा विश्वास त्यांना असल्याच त्यांनी सांगितलं.

निवडून आल्यावर पुढच्या पाच तुम्ही काय करणार असं विचारलं असता आपल्या शहराचे विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *