मुंबई : एन निवडणूकीच्या धामधुमीत शेअअर मार्केट पत्याच्या बंगल्यासारका कोसळला. शुक्रवारी सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली.  सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजार कमी तोट्यात होता, पण हळूहळू तीव्र घसरण होत गेली. काही वेळातच गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपयांचं नुकसान  झालं आहे.

बँक निफ्टी, स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली आहे. बँक निफ्टीमध्ये ११०० हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. तर सेन्सेक्स ९०० अंकांनी घसरला. याशिवाय निफ्टी ३०० अंकांनी घसरला.

गेल्या काही दिवसांपासून तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणूकदारांची सततची माघार यामुळे भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज घसरत आहेत. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप पोर्टफोलिओ शेअर बाजारात त्सुनामीप्रमाणे कोसळले. BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ९.८ लाख कोटी रुपयांनी घसरुन ४३५ लाख कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ केवळ एका दिवसात गुंतवणूकदारांचे मूल्यांकन सुमारे १० लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

आज सकाळी ८०,१८७.३४  अंकांवर सेन्सेक्स उघडला, तर त्याची दिवसाची उच्च पातळी ८०,२५३.१९ होती. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स -६६३ अंकांनी घसरला आणि ७९,४०२.२९ वर बंद झाला. निफ्टी २१८.६० अंकांनी घसरला आणि २४,१८०.८० वर बंद झाला, जो आज सकाळी २४,४१८.०५  वर उघडला होता. बीएसईच्या टॉप ३० समभागांपैकी २० समभाग घसरले., तर १०  समभाग वधारले. इंडसइंड बँकेचा शेअर १८.७९  टक्क्यांनी घसरून १०३८ रुपयांवर आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *