कुडाळ : कोणताही गाजावाजा न करता महायुतीचे उमेदवार डॉ.निलेश राणे यांनी शिवसेना(शिंदे गट) पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे दाखल केला.  यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत भाजपा खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,शालेय शिक्षण मंत्री व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार  दीपक  केसरकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
अर्ज दाखल करताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती.माजी खासदार  राज्य भाजपाचे सचिव व याच मतदारसंघाचे प्रमुख असलेले राणे यांनी परवाच शिंदे सेनेत प्रवेश केला आणि काल याच मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी सुद्धा जाहीर झाली.आज सकाळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या मतदारसंघात आता सेना विरुद्ध सेना अशी सरळ लढत होणार आहे. ‘ऊबाठा ‘सेनेचे व महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, माजी आमदार प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संजू परब, बबन शिंदे, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, माजी जि. प. अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, चिटणीस विनायक राणे, राजू राऊळ, अशोक सावंत, आनंद शिरवलकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, भाजपा गटनेता विलास कुडाळकर आदी महायुतीच्या घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना निलेश राणे म्हणाले, ‘आमची बांधिलकी ही जनतेशी आहे,आमच्या सोबत जनता आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शन करण्याची आम्हाला आवश्यकता नाही.  जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल यात वाद नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *