अर्णव, स्वराचे संघर्षपूर्ण विजय
मुंबई : सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले आणि मुली एकेरीत अनुक्रमे अर्णव वाघ आणि स्वरा गुडेकर यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) टेबलटेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत 1-2 असा पिछाडीवर पडलेल्या अर्णवने दमदार पुनरागमन करताना चौथ्या गेममध्ये बरोबरी साधली. त्यानंतर पाव्या आणि अंतिम गेमसह 11-8, 6-11, 8-11, 14-12, 11-8 अशी बाजी मारली. आदित्य दलाल, जेहान कोलाह आणि साहिल मोहिते यांनीही आगेकूच केली.
मुलींमध्ये स्वरा आणि नीरजा खेडेकर यांच्यातही मोठी चुरस पाहायला मिळाली. पाच गेममध्ये रंगलेल्या लढतीत स्वराने 5-11, 11-7, 11-8, 6-11,11-5 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्वरासह सारा जामसुतकर, क्रिशा तन्ना आणि इन्सिया भावनगरवाला यांनी अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अंशिता ताम्हणकरने अर्पिता बोर्हाडेला 8-11, 11-8, 12-10, 8-11, 11-7 असे हरवले. श्वेता पार्टे-नायकने मुग्धा देसाईवर 3-0 अशी मात करताना आगेकूच केली.
पुरुष एकेरीत मोहित वैष्णवने उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला तरी चैतन्य आहुजाने 11-7, 11-7, 4-11, 9-11, 11-9 असे झुंजवले. मंदार चिपळूणकरने शिवम आंब्रेचा 11-4, 6-11, 11-7, 11-8 असा पराभव केला. पार्थ मगरने तन्मय राणेला 11-4, 11-9, 11-2 तर शुभम आंब्रेने रवी चोप्राला 11-5, 11-3, 11-9 असे सरळ गेममध्ये हरवत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी – ( महिला एकेरी ) – अंशिता ताम्हणकर विजयी वि. अर्पिता बोर्हाडे 8-11, 11-8, 12-10, 8-11, 11-7; श्वेता पार्टे नायक विजयी वि. मुग्धा देसाई 11-4, 11-7, 11-3).
पुरुष एकेरी – पार्थ मगर विजयी वि. तन्मय राणे 11-4, 11-9, 11-2; मोहित वैष्णव विजयी वि. चैतन्य आहुजा 11-7, 11-7, 4-1, 9-11, 11-9; शुभम आंब्रे विजयी वि. रवी चोप्रा 11-5, 11-3, 11-9; मंदार चिपळूणकर विजयी
