ठाणे : लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेकडो दिव्यांनी उजळून गेले.

 

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख सचिन चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी प्रभाग क्र २२ खारकर आळी येथील धर्मवीर आनंद दिघे शक्तीस्थाळावर आकाश कंदील लावत याठिकाणी शेकडो दिवे लावले त्यामुळे हा संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून गेला होता.यावेळी शिवसेना महिला आघाडी ठाणे शहरप्रमुख सौ. स्मिता इंदुलकर, विभाग प्रमुख संजय भोई, आशिष वैती, विभाग संघटक राकेश जाधव उपविभाग प्रमुख गणेश मुणगेकर, अजय पवार योगेश घुमटकर, सुशील भोईर,देवशी राठोड, प्रकाश समजीसकर,रवी पाथरे शाखाप्रमुख परेश कांबळे, दिनेश मेहरोल, हिमांशू चौधरी, महिला आघाडी शाखा संघटिका रुपाली जाधव, उपशाखाप्रमुख चेतन मुणगेकर, गणेश बामणे, समीर नाईक, युवा सेना उपविभाग अधिकारी वरूण मानकामे, कृतीक पाटील शिवसैनिक प्रदीप घोसाळकर, योगेश खुरपे, भाग्यश्री जाधव,समाजसेवक सुरेंद्र भोई आदी उपस्थित होते.

 

खऱ्या अर्थाने  शिवसैनिकांना ज्याठिकाणी शक्ती मिळते ते स्थान म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शक्तीस्थळ आहे. ज्या दिघे साहेबांनी गोरगरीब दिन  दुबळ्या लोकांच्या घरी दिवाळी कशी साजरी होईल याची काळजी घेतली, दिघे साहेबांनी कायम दिन दुबळ्या  गरीब लोकांबरोबर दिवाळी साजरी केली.दिघे साहेबांचे  आशीर्वाद कायम एकनिष्ठ प्रामाणिक शिवसैनिकांच्या पाठीशी आहेत म्हणूनच  दिघे साहेबांच्या बरोबर आम्ही  दिवाळी साजरी केली.तसेच दिवाळीचा पहिला दिवशी दीपप्रज्वलित करू सर्वांच्या जीवनातील अंधार नष्ट होऊन महाराष्ट्राची व ठाण्याची जनतेला सुखी समृद्धी लाभावी अशा शुभेच्छा सचिन चव्हाण यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *