मुंबई : मुंबई कौटुंबिक न्यायालय, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई कौटुंबिक न्यायालय वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिन आणि मानसिक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी के. ई. एम. रुग्णालयातील मानसोपचार विभागातील प्राध्यापिका डॉ. क्रांती कदम यांचे `ताण तणाव आणि चिंता यांचे व्यवस्थापन’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

 

“कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ” ही मानसिक आरोग्य दिन २०२४ ची थीम आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी ताणतणावाची लक्षणे, दुष्परिणाम तसेच उपाय यांची माहिती दिली.

 

सकारात्मक विचारांचे महत्व, वेळेच्या व्यवस्थापनाची आवश्यकता, शारीरिक आरोग्याची काळजी घेतो तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे कसे महत्वाचे याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंगला ठाकरे, न्यायाधीश गोविंद वायाळ, न्यायाधीश शुभदा ठाकरे, न्यायाधीश आर. आर. थोरात आणि मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे, कौटुंबिक न्यायालय मुंबई वकिल संघटनेचे अध्यक्ष सशी नायर हे मान्यवर तसेच समुपदेशक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विवाह समुपदेशक संजीवनी आरवेल यांनी केले आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व सांगितले. वक्त्यांची ओळख विवाह समुपदेशक नूतन अभंग तनिर यांनी करून दिली.

 

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *