भीमशक्तीचा मिहीर कोटेचा यांना पूर्ण पाठिंबा असल्याची जोगेंद्र कवाडे यांनी दिली ग्वाही
मुंबई : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सोमवारी मुलुंड विधानसभेचे भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयास भेट दिली. यावेळी प्रा. कवाडे यांनी कोटेचा यांना विधानसभा निवडणूक प्रचारात पूर्ण साथ देण्याची तसेच त्यांच्या समर्थनार्थ भीमशक्ती पूर्णपणे पाठीशी उभी करण्याची ग्वाही दिली.
यावेळी प्रा. कवाडे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र ‘पीआरपी’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व लघुउद्योग महाराष्ट्र महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. जयदीप भाई कवाडे तसेच ‘पीआरपी’चे मुंबई अध्यक्ष श्री. विलास निकाळे होते. मिहीर कोटेचा यांनी शाल देऊन तिघा मान्यवरांचे स्वागत केले.
भीमशक्तीचा पाठिंबा मिळाल्यामुळे माझी ताकद वाढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार देशाला बांधून ठेवतो तसेच एकजूट व समानतेसाठी लढण्याची प्रेरणा देतो. समाजाच्या न्याय हक्कासाठी या विचारांची जोपासणा करणे माझे कर्तव्य समजतो, असे मिहीर कोटेचा यावेळी म्हणाले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपाइं (अ ) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा ‘पीआरपी’ असे दोन ‘रिपाइं’चे प्रमुख गट महायुतीचे घटक पक्ष आहेत. ‘रिपाइं’चे हे दोन्ही गट मिहीर कोटेचा यांच्या मुलुंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय आहेत.
0000