महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी वेळ संपून गेली तरी महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारीचे घोळ आणि गोंधळ सुरुच होता. आता 4 नोंव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या मुदती वेळीच सारे खरे चित्र स्पष्ट होईल. मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणा पर्यंत आमदारकीसाटी उत्सुक अशा उमेदवारांचे दहा हजार नऊशे अर्ज दाखल झाले होते. अनेक उमेदवार दोन वा तीन अर्ज दाखल करून ठेवत असतात. त्यामुळे अर्जांची संख्या आणि प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या यात अंतर असते. त्या चालीवर सात हजार नऊशे पेक्षा अधिक उमेदवार सध्या रिंगणात आहेत. विधानसभेतील आमदारांच्या जागा आहेत २८८ आणि अर्जदारांची संख्या आहे सात हजार नऊशे. या वरून यंदाच्या निवडणुकीचा माहौलच स्पष्ट होतो. जो तो उठतोय, त्याला वाटतेय की मी सहजच निवडून येऊ शकतो. कारण इतक्या उमेदवारांच्या मारामारीत माझे जे हक्काचे मतदार आहेत ते सारे जरी राखता आले व मतदानकेंद्राप्रयंत पोचू शकले तरी माझे काम झालेच की…!! पण प्रत्यक्षात तसे होत नसते, याचा प्रत्यय, या सर्व हजारो उमेदवारांना, निकाल लागेल तेंव्हा येईलच. पण तरीही प्रत्येक मतदारसंघांत जिंकण्याची किमान शक्यता असणारे आठ ते दहा उमेदवार दिसणार आहेत, हे मात्र काल स्पष्ट झाले. सहा मोठ्या पक्षांचे मिळून साडे पाचसे उमेदवार तर रिंगणात दिसणारच आहेत. पण अनेक ठिकाणी तिकीटे नाकरलेल्या माजी आमदारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व मोठ्या पक्षांचे काही नाराज उभे आहेत. ज्यांना तिकिटाची आशा होती, पण ऐन वेळी नेत्यांनी दुसऱ्या पक्षामधून यात केलेल्यांना तिकिटे दिली, असे उत्सुक इच्छुक नाराज बहुसंख्य आहेत. उदाहरणा दाखल दक्षिण मुंबईतील मुंबादेवीची जागा पहा. इथे भाजपाचे आमदार अनेकदा निवडून गेले आहेत. शिवसेनेलाही ती जागा पूर्वी मिळालेली आहे. अतुल शहा इथे पूर्वी आमदार होते सध्या भजापात इच्चुक उमेदवार होते. मागे केंव्हा तरी युतीच्या जागा वाटपाच्या वाटा-घाटीत ती जागा शिवसेनेकडे गेली, तेंव्हा सेनेचे अरविंद नेरकर हे तिथे आमदार राहिले होते. या वेळी भाजपा ती जागा घेणार असे वातावरण होते. ठाकरे व शिंदे अशा दोन सेना तयार झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राज्यात असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथे थोड्याफार फरकाने असेच चित्र दिसते आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चांच्या गुऱ्हाळात, मुंबादेवीची जागा ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या पारड्यात टाकली गेली. पण उमेदवार भाजपाचे घ्यायची अट भाजपाने टाकली होती की शिंदेंकडे या जागेसाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध नव्हता कोण जाणे. पण त्यांनी भाजपाच्या प्रदेश कोषाध्य राहिलेल्या व राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी राहिलेल्या शायना एन.सी. यांना शिवसेनेत बोलावून प्रवेश दिला. लगेचच शायना यांच्या हाती धनुष्यबाण व सेनेचा भगवा दिला आणि सोबत मुंबादेवीचा ए बी फॉर्मही दिला ! शायना एन सी या शिंदेंच्या उमेदवार म्हणून मुंबादेवीतून उभ्याही राहिल्या. शायना हे मुंबईच्या फॅशन उद्योगातील प्रसिद्ध नाव आहे. साडी किती प्रकारांनी नेसता येते याचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड या शायना बाईंच्या नावावर नोंद आहे. त्यांनी डिझाईन केलेल्या लाखो रुपयांच्या साड्या विख्यात उद्योजकांच्या बायकांच्या आणि प्रख्यात नट्यांच्या अंगावर झळकत असतात. त्या भाजपच्या कार्यकर्त्या म्हणूनही बऱ्यापैकी सक्रीय असतात. त्यांचे वडील नाना चुडासामा हे जायंट क्लबचे संस्थापक व कित्येक वर्षे अध्यक्ष राहिलेले दक्षिण मुंबईतील ख्यातकीर्त उद्योजक होते. असा हाय फाय शायना नाना चुडासामा या मुंबादेवीतून भाजपा, सेना व रा.काँ. युतीच्या उमेदवार ठरल्या तेंव्हा अतुल शहांनी बंड पुकारले णि अपक्ष म्हणून उमदवारी अर्ज दाखलही करून टाकला. तिकडे अजितदादा पवारांनी अगदी अखेरच्या क्षणी भाजपावर नबाब मलिक नावाचे क्षेपणास्त्र डागले आहे. मुंबईच्या चेंबूर परिसरातील शिवाजीनगर मतदारसंघातून नबाब मलिक यांना ए बी फॉर्म दादांनी देऊन टाकला आहे. मलिक यांना भाजपाने कडवा विरोध केला होता. त्यांचा अर्ज प्रत्यक्षात अखेरच्या दिवशी दाखल झाल्या नंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीर करून टाकले आहे की ज्या व्यक्तीवर दाऊदच्या संबंधातील व मुंबई बाँबस्फोटातील कुख्यात आरोपीची जमीन घेतल्याचा आरोप हे व ते खटल्यातून जामिनावर बाहेर आलले आहेत अशा मलिक यांचा प्रचार भाजपा बिलकुल करणार नाही. मात्र शेजारच्या अणुशक्ती नगरातील दादा गटाच्या उमेदवार व मलिक यांची कन्या सना मलिक यांचा प्रचार भाजपा करणार असेही शेलारांनी स्पष्ट केले आहे. हा आणखी एक मोठाच घोळ महायुतीत झाला आहे.  सध्या मविआ आणि महायुती दोघांनीही विधानसभेतील 288 जागांपेक्षा अधिकचे अर्ज अधिकृत पक्षचिन्हांसह व ए बी फॉर्मसह दाखल करून टाकले आहेत. मविआमध्ये ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वांनीच एकमेकांच्या जागांवर अतिक्रमणे केलेली असून अशा 11 जागांवर मविआ मैत्रीपूर्ण लढती कऱणार का हा प्रश्न आहे. तशीच स्थिती थोड्यापार फरकाने महायुतीत असून तिथे पाच जागांवर दोन दोन मित्रपक्षांनी अर्ज दाखल करून टाकले आहेत. या शिवाय मराठा समाजाचे मसीहा मनोज जरांगे-पाटील हाही या निवडणुकीतील महत्वाचा घटक आहे. त्यांचे नेमके कोण उमेदवार उभे आहेत हे अद्याप ठरायचे आहे. आशीर्वाद मागायला आंतरवाली सराटीत गेलेल्या सर्वांनाच त्यांनी अर्ज दाखल करून टाकायला सांगितले होते. तिथून सध्या येणारी आणखी माहितीही चित्त-चक्षु-चमत्कारिक आहे. मराठ्यांना ओबीसींच्या कोट्या मधूनच आरक्षण दिले पाहिजे असा नवा घोषा जरांगेंनी अलिकडेच लावला होता व त्यासाठी सहावे आमरण उपोषणही त्यांनी केले होते. आता ते मराठ्यांच्या शक्तीला दलित णि मुस्लीम समाजाची जोड मिळवण्याची खटपट करत आहेत. त्यासाटी गेल्या दोन दिवसात त्यांच्या आडवाटेच्या गावी हेलिकॉप्टरमधून मुस्लीम व दलित नेते मंडली यायाची होती पण म्हणे हेलिकॉप्टरची अडचण झाली म्हणू नते ले नाहीत ता ते येतील व चर्चा झडतील नंतर मराठा मुस्लीम दलित गाडीची दाव्ही जरांगे फिरवतील व नंतर म्हणजे ३ वा ४ तारके नंतर दिवाळीची तषबाजी सरल्यावर जरांगेंची उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल… !! दरम्यान महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे उमेदवार राज्यात सर्वत्र दिसतील अशी जी अपेक्षा सुरुवातीला होती ती विफल ठरलेली आहे. ठराविक व मोजक्याच मतदारसंघात मनसैनिक लढतीत उतरले आहेत. राज ठाकरेंनी 137 उमेदवाऱ्या दिल्याचे निवडणूक योगाच्या वेबसाईटवर दिसत होते. तर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी 110 जागी उमेदवार उतरवले आहेत. या शिवाय राजु शेट्टी, संभाजी छत्रपती व बच्चु कडु यांच्या आघाडीची मजल कुठ पर्यंत गेली ते अद्याप स्पष्ट झालेलच नाही. पण एकूण हालचालींवरून तरी त्यांच्या उमेदवारांची संख्या फार मोठी दिसत नाही. या शिवाय अनेक माजी आमदार खासदारांनी पक्षा विरोधात बंड पुकारून अर्ज दाखल केले आहेत. अशांची संख्या राज्यात शंभरापेक्षा मोठी असण्याची शक्यता आहे. मुंबईत बोरिवलीतून माजी आमदार व माजी खासदार गोपाळ शेट्टी त सोलापुरातून माजी आमदार दिलीप मानेंनी बंड पुकारले आहे मानेंचे बंड हे शरद पवारांच्या रा.काँ व मविआच्या विरोधात दिसते आहे. मराठा आरक्षणासाठी पूर्वी झुंजणारे कै विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंना शरद पवारांनी वाजत गाजत पक्ष प्रवेश दिला होता. पण उमेदवारी दिली नाही. त्या आता बीडमध्ये पवारांच्या उमेदवाराच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. असा रीतीने अनेक मतदारसंघांतून बंडांची ग लागलेली आहे. त्याचा परामर्श पुढच्या काही दिवसात घ्यावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *