अशोक गायकवाड
पनवेल : सुतिकागृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हा दवाखाना पनवेलकरांसाठी वरदान ठरत आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळत आहे अशी माहिती अॅड. यशवंत भोपी यांनी दिली. आजच्या धकाधकीच्या जीवनात दवाखाना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यात सर्व सुविधायुक्त,स्वच्छ,उत्तम निदान होणारे व परवडणारे असे दवाखाने लाभणे ही दुर्मिळ गोष्ट बनलेली आहे. अशा युगात पनवेलकरांना सर्व आरोग्य सुविधा देणारा सुतिकागृह दवाखाना नव्या रूपात सुसज्ज इमारतीमध्ये चालू झालेला असून तिथे सुतिकागृहासह अनेक रोगांवर उत्तम प्रकाराने सज्ज असे शुश्रुषा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झालेले आहे. अलीकडेच या दवाखान्याची नवीन वास्तू आपल्या सेवेसाठी कार्यान्वित झालेली असून या ठिकाणी आयसीयू पासून लॅप्रोस्कोपी सारख्या अनेक रोगांवर उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वीच्या( जुने पोस्ट ऑफिस पनवेल )जवळ सुतीकागृह म्हणून नावाजलेल्या या दवाखान्यास यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या रूपात साकार झालेला हा दवाखाना दोनच वर्षात पनवेलकरांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. या दवाखान्यात दोन नातेवाईकांना उपचारासाठी घेऊन जाण्याचा योग आला. तेथील उपचार सुविधा,कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व झालेली शस्त्रक्रिया पाहून हा लेख लिहिण्याचा मोह आवरला नाही. अजूनही अनेक लोकांना ह्या दवाखान्याची माहिती नसावी असे दिसते.त्यामुळे पनवेलच्या मध्यवर्ती असलेल्या या दवाखान्याचा लाभ व अनुभव गरजू जनतेने घ्यावा असे जनतेस आवाहन आहे. येथील डॉक्टर अंजली मॅडम तसेच डॉक्टर स्वप्नील वाघ व जनसंपर्क अधिकारी चांदसर हे आरोग्य सेवेसाठी तत्पर असून थोड्याच अवधीत त्यांनी दवाखान्याचे नावलौकिक वाढविले असून सदरचा दवाखाना जनतेसाठी वरदान ठरत आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळत आहे हे आणखी एक विशेष आहे असे अॅड. यशवंत भोपी यांनी सांगितले.
0000