जगातील आघाडीची कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन संकटात सापडली आहे. कंपनीने मोठ्या खर्चात कपात करण्याची योजना तयार केली आहे. याअंतर्गत कंपनीचे अनेक प्लांट बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय पगारातही दहा टक्के कपात होणार आहे. टाळेबंदीचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचारी संघटनेला लवकरच याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. त्यांना वाढ दिली जाणार नाही आणि बोनसमध्येही कपात होण्याची शक्यता आहे.
‘हँडल्सब्लाट फायनान्शियल डेली’च्या अहवालाच्या आधारे अहवालात दावा करण्यात आला आहे की फोक्सवॅगनने जर्मनीतील आपले अनेक प्लांट बंद करण्याची योजना आखली आहे. अहवालानुसार, कंपनीचे सीईओ ऑलिव्हर ब्लूम यांनी फॉक्सवॅगन समूहासाठी चार अब्ज युरो (4.3 अब्ज डॉलर) खर्चात कपात करण्याची योजना तयार केली आहे. कंपनीच्या 87 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी पावले उचलली जात आहेत. हँडल्सब्लाटने दावा केला आहे की दहा टक्के पगार कपातीशिवाय कंपनीने 2025 आणि 2026 मध्ये वेतनवाढ दिली जाणार नाही, हेदेखील ठरवले आहे. बोनसमध्ये कपात करण्याचाही विचार केला जात आहे.
कर्मचारी या योजनांना कडाडून विरोध करू शकतात.
कंपनी केवळ नफा कमावण्यावर भर देत असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. व्यवस्थापनाची विचारधारा योग्य नाही. फॉक्सवॅगनने सप्टेंबरमध्ये पुनर्रचनेची माहिती देऊन कर्मचाऱ्यांना आश्चर्यचकित केले होते. उत्पादन खर्च वाढत असल्याचे कंपनीने म्हटले होते. त्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर भर देण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. याशिवाय चीनसारख्या बाजारपेठेतही तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. हे सर्वच कंपन्यांसोबत होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.