आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात ओवळा-माजीवडा, मीरा-भाईंदर शिवसेनेत जोरदार इनकमिंग
अनिल ठाणेकर/अरविंद जोशी
भाईंदर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विकासकामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन , मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. आतापर्यंत मीरा भाईंदरच्या तीन माजी नगरसेवकांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर उबाठा गटाचे , काँग्रेस व इतर अनेक पक्षाचे पदाधिकारी , शेकडो कायकर्ते यांनी गेल्या १० दिवसात शिवसेनेत प्रवेश केला असून त्यामुळे ओवळा माजीवडा मिरा भाईंदर विधानसभेत शिवसेना आणखी मजबूत झाली आहे.
शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत विकासकार्याचा डोंगर मतदारसंघात उभा केला आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन दररोज पक्ष प्रवेश होत आहेत. मीरा भाईंदर येथील काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका सौ. सुनिता पाटील व त्यांचे पती श्री. कैलास पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना पक्षाचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक , खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. भाईंदर पूर्वेकडील उबाठा गटातील माजी नगरसेवक जयंतीलाल पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात मिरा भाईंदर येथे जाहीर प्रवेश केला.भाईंदर पूर्वेचे माजी नगरसेवक अरविंद ठाकूर यांनीही आमदार सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात मिरा भाईंदर येथे प्रवेश केला. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासाने आणि आमदार सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील चिरागनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक सुरेश दाजी भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेबांचे खंदे समर्थक चिरागनगरमधील माजी नगरसेवक विलास मोरे यांचे सुपुत्र विशाल मोरे व त्यांचे बंधू दिलीप मोरे व ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्य नगरमधील सुधाकर नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.त्याचबरोबर काल रात्रीही मोठा पक्षप्रवेश पार पडला. मिरा भाईंदर येथील उबाटा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक मुख्य पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करुन पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सामान्य माणसांच्या हक्कासाठी, आपण हे पाऊल उचलले आपल्या या निर्णयावर व माझ्यावर असलेला विश्वास दाखवून पक्षप्रवेश करण्यात आला. दिवसेंदिवस आपल्या शिवसेना पक्षाची ताकद अजून बळकट होत आहे, याचा मला आनंद आहे असे आमदार सरनाईक म्हणाले.या पक्षप्रवेशवेळी शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. याआधी उबाठा गटाचे भाईंदर पूर्वेकडील शहरप्रमुख , उपजिल्हप्रमुख , विभागप्रमुख , शाखा प्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
00000