ठाणे : कनस जगा (ड्रीम लँड), देशातील पहिला आदिवासी बाल चित्रपट महोत्सव कुदूम्बश्री या केरळ सरकारच्या प्रकल्पाने सेंट तेरेसा कॉलेज, एर्नाकुलम येथे आयोजित केला होता. केरळमधील डाव्या लोकशाहस आघाडी सरकारद्वारे आखलेला हा आणखी एक अनोखा उपक्रम आहे. या चित्रपट महोत्सवात आदिवासी मुलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या १०२ लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले. यात सुमारे १, २०० लोकांचा सहभाग होता, ज्यात ६०० आदिवासी मुले आणि त्यांचे मार्गदर्शक यांचा समावेश होता.
महोत्सवाचे उद्घाटन कॉम्रेड एम बी राजेश, मंत्री – स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या हस्ते करण्यात आले आणि समापन समारंभाला उद्योगमंत्री कॉम्रेड पी. राजीव यांनी संबोधित केले.वायनाड आदिवासी भागातील थिरुनेल्ली आणि नूलपुझा (३५) या भागातील सर्वाधिक लघुपट दाखवले गेले. पलक्कडमधील अट्टापडी, मलप्पुरममधील निलांबूर, इडुक्कीमधील कंथल्लूर आणि मरायूर, कन्नूरमधील अरालम, कासारगोडमधील कोरागा जमाती, पठाणमथिट्टा येथील मलापंदरम जमाती आणि त्रिशूरमधील कादर जमातीच्या आदिवासी मुलांनी बनवलेल्या चित्रपटांचा यात समावेश आहे.
०००००