माथेरान : आज पासून माथेरानच्या पर्यटन हंगामास सुरुवात होत असून येथील कायदा सुव्यवस्था मर्यादित रहावी व आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता माथेरानमध्ये माथेरानचे एपीआय अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस व तालुक्यातील पोलिसांनी लॉंग रूट मार्च काढून नागरिकांना सुरक्षित बाबत शुभ संदेश दिला.
आज पासून माथेरानच्या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. व दिवाळी पर्यटन हंगाम हा येथील महत्त्वाचा पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो.पर्यटनाला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली आहे माथेरान मध्ये देश विदेशातून आज मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात येथे पर्यटक तसेच मुस्लिम धर्मीय पर्यटकांचा जास्त प्रमाणात दिसून येत आहे माथेरान तसे गुन्हेगारी दृष्ट्या शांत असले तरीही येथे या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरून पर्यटक येत असतात त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता माथेरान पोलीस स्टेशन नेहमीच सज्ज असते व येथील नागरिकांना तो संदेश पोहोचविण्याकरता आज येथील विविध भागांमध्ये पोलिसांनी लॉंग रूट मार्च काढून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आज बाजारपेठेतून निघालेल्या या रूट मार्च कडे आलेले पर्यटक व स्थानिक नागरिक आश्चर्याने पाहत असताना पहावयास मिळाले.
कोट
पावसाळा नुकताच संपल्यानंतर माथेरानचा दिवाळी पर्यटनास आज खऱ्या अर्थाने सुरुवात होत असून गुजरात मधील तसेच मुस्लिम पर्यटकांनी माथेरान कडे मोठ्या संख्येने ओढ दाखवल्यामुळे हा पर्यटन हंगाम चांगला जाण्याची चिन्हे दिसत आहे व त्याचा फायदा निश्चितच हॉटेल व्यवसायाला होणार आहे.
मिलिंद कदम — हॉटेल व्यवस्थापक माथेरान
कोट
माथेरानला तुरळक गर्दी आहे. आम्हाला समजले होते की १ तारखेला मिनिट्रेन सुरू होणार आहे पण ही गाडी सुरू नाही त्यामुळे आमच्या मुलांचा हिरमोड झाला आहे. रेल्वे प्रशासनाने लवकरच ही सेवा सुरू करावी.
अश्लेष पराग—पर्यटक मुंबई