अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या सह नुकतीच केळकर यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.
भाजपने पुन्हा एकदा संजय केळकर यांच्या विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांनी भेट घेतली आणि पाठिंबा दर्शविणारे पत्र दिले आहे. केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपने दिली त्यासाठी मी भाजपचे आभार मानतो असे सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला. केळकर हे असे आमदार आहेत की जे गोर गरीब जनेतसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात. जनेतला न्याय देणार खरा आमदार हे केळकर आहेत असेही ते म्हणाले. केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचे समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे असे अवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले. केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.