माथेरान : पर्यटनस्थळ माथेरान मध्ये मागील काही वर्षांपासून अवैध धंदे तेजीत दिसत आहेत. याबाबत कुणाच्याही तक्रारी येत नसल्याने मटका आणि ऑनलाइन रेसेस खेळण्यासाठी युवा वर्गाची झुंबड पडत आहे. यामध्ये नियमितपणे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात हे जुगार खेळण्यासाठी येथील अनेक तरुण त्याचप्रमाणे परिसरातील आदिवासी लोक सुध्दा कर्ज बाजारी झाल्याचे बोलले जात आहे. तर काही जणांनी सावकारांकडून दहा टक्के व्याजाने पैसे काढून ह्या जुगारात लावले होते. हा कर्जाचा अवाढव्य डोंगर फेडता येत नसल्यामुळे काहीजण गाव सोडून सुध्दा गेले होते.शेवटी त्यांना मित्र मंडळींनी आधार देऊन माघारी आणल्याचे बोलले जात आहे.गावाच्या वस्तीच्या ठिकाणी हे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत.याकामी अनेकदा पोलीस कर्मचारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती.पण हे अवैध धंदे आजही खुलेआम बिनधास्तपणे भर वस्तीत सर्रासपणे सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *