अशोक गायकवाड
रायगड : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूकांदरम्यान, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून स्वप्नील ममगाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८६२३८६६५९९ असा आहे. ते सात विधानसभा मतदार संघातील नागरिकांना शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे सायंकाळी ४.०० ते ५.०० या वेळेत भेटतील.
तरी नागरिकांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात काही तक्रार असल्यास वरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षक यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *