विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

पुणे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२२-२३ घेण्यात आली होती, या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू अश्विनी शिंदे (धाराशिव) (मुली गट)  व  रूपेश कोंडाळकर (ठाणे)( कुमार गट) या खेळाडूंना पुनीत बालन ग्रुप तर्फे इलेट्रिक बाईक देण्यात आली.

स्पर्धा कालावधीत पुनीत बालन यांनी इलेट्रिक बाईक देण्याची घोषणा केली होती. नुकताच पुनीत बालन कार्यालय पुणे येथे पुनीत बालन यांच्या हस्ते इलेट्रिक बाईक देण्यात आली. या  एका इलेट्रिक बाईक ची किंमत १ लाख २९ हजार असून अश्या दोन इलेट्रिक बाईक देण्यात आल्या. पुनीत बालन संघमालक मुंबई खिलाडीज व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांचे सर्वांनी विशेष आभार व्यक्त केले.

या प्रसंगी भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार श्री. गोविंद शर्मा, धाराशिव जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव श्री. प्रविण बागल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव श्री. विकास सूर्यवंशी तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *