मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विविध संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होतील.

शुक्रवार, १५ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता विदुषी शुभदा पराडकर यांच्या गायनाने वर्धापन दिन संगीत कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यांना तबल्यावर प्रवीण करकरे, संवादिनीवर ओंकार अग्निहोत्री आणि सारंगीसाठी गुरुप्रसाद हेगडे साथ देतील. शनिवार, १६ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता पं. सुदिप चट्टोपाध्याय यांचे बासरी वादन होणार असून त्यांना तबल्यावर पं. अनुतोष देघारिया साथ देतील. रविवार, १७ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता पं. साजन मिश्रा यांचे गायन होईल. त्यांना स्वरसाथ स्वरांश मिश्रा यांची असेल तर तबल्यावर मंदार पुराणिक आणि संवादिनीवर सिद्धेश बिचोळकर साथ देतील.

वर्धापन दिनाचे हे सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *