कांगा लीग क्रिकेट स्पर्धा

मस्कती सीसीचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय

मुंबई : एमसीए डॉ. एच. डी. कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत डी डिव्हिजनमध्ये मस्कती सीसीने दहीसर एससीवर  पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. त्यात साकिब मुलानीची (121 धावा) शतकी खेळी महत्वपूर्ण ठरली.

दहिसर एससीने प्रथम फलंदाजी करताना आकाश मांगडे (110 धावा) आणि रुशील पारकरच्या (84 धावा) दमदार खेळीच्या जोरावर 5 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, मस्कती सीसीने 3 बाद 228 धावा करताना पहिल्या डावात आघाडी घेतली. साकिबने 121 धावांची चमकदार खेळी केली. सार्थ वाघेलाने 83 धावा करताना त्याला चांगली साथ दिली.

सी डिव्हिजनमध्ये पांडुरंगवाडी सीसीने कोळी कंबाईन क्रिकेट इलेव्हनवर पहिल्या डावाच्या आघाडीवर मात केली. पांडुरंगवाडी सीसीने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 8 बाद 144 धावा केल्या. त्यानंतर अचूक गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला 64 धावांमध्ये गुंडाळून फॉलोऑन लादला. साईराज विनयगममूर्तीने (5/15) निम्मा संघ गारद करताना त्यात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक – सी डिव्हिजन: पांडुरंगवाडी सीसी – 8 बाद 144 (यश पै 36, चिन्मय केळकर 34; चिन्मय पाटील 3/53) वि. कोळी कंबाईन क्रिकेट इलेव्हन – सर्वबाद 64(साईराज विनयगममूर्ती 5/15) आणि फॉलोऑननंतर (4 बाद 58) सुमीत प्रजापती 4/19). निकाल: पांडुरंगवाडी सीसी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

भटनागर स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन – 9 बाद 192 (पार्थ चंदन 74, जितेश राऊत 44; राजेश सोनी 4/37) वि. घाटकोपर जॉली जिमखाना – 155 सर्वबाद (राज जैन 32, प्रतीक म्हात्रे 32; रोहित यादव 6/37, पार्थ चंदन 37/3) ६६). निकाल: भटनागर स्पोर्ट्स पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

डी डिव्हिजन: कांदिवली सीए – सर्वबाद १६१(फ्लिन पाटील ५८, पार्थ शहा ४८; सुमेध तारे ४/४१, आकाश माळी ३/२२) वि. वरळी एससी – बाद ६ बाद १६३(सुमेध तारे ३७, बबली शर्मा ३३). निकाल – वरळी एससी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

अमर सीसी – सर्वबाद १३७(जयनेश पटेल ३१; पियुष कनोजिया ४/५१, ध्रुव गोठी ३/२१) वि. माझगाव सीसी – सर्वबाद १२८(आदित्य शेळके ५८; दिग्विजय सिंग ५/४३, सूरज सिंग ३/३६). निकाल – अमर सीसी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

दहिसर एससी – 5 बाद 212 (आकाश मांगडे 110, रुशील पारकर 84) वि. मस्कती सीसी – 3 बाद 228 (साकिब मुलानी 121, सार्थ वाघेला 83). निकाल – मस्कती सीसी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

सुपरस्टार एससी – सर्वबाद 113(सुदर्शन आचार्य 43, आर्य गायकवाड 4/26, भावेश पटेल 4/29) आणि 5 बाद 62 (रोहन तांबे 30; आर्य गायकवाड 3/12) वि. वेलिंग्टन सीसी – सर्वबाद 98(अनिलकुमार रोनकी/255 , सिमांत दुबे 4/52). निकाल – सुपरस्टार एससी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *