ठाणे : स्री शिक्षण, समानता, सत्यासाठी देह झिजविणारे, सत्यशोधक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव. परिवहन सदस्य नितिन पाटील, ठाणे सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, जिल्हा कार्यकारिणी सचिव लखबीर गील, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समिर पेंढारे, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, महिला विधानसभा अध्यक्षा अरुणा पेंढारे, वंदना खानोलकर, उथळसर ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मी वैती आदी पदाधिकारी उपस्थित होते.
