विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या आठ ते दहा नोव्हेंबर दरम्यान नेहरूनगर नागरिक मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, नेहरूनगर, कुर्ला (पूर्व) येथील सभागृहात दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येत आहे. शुक्रवार आठ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून नऊ तारीख आणि दहा तारखेला संपूर्ण दिवस हे प्रदर्शन रसिकांना पाहण्यास उपलब्ध आहे. या प्रदर्शनातील दिवाळी अंक हे विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून रसिकांना 20% सवलतीच्या दरामध्ये हे दिवाळी अंक खरेदी करता येतील. महाराष्ट्राच्या विविध भागातून प्रकाशित होणारे दिवाळी अंक येथे रसिकांना पाहण्यास मिळतील.
