अशोक गायकवाड
रायगड : लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम ७७ खाली निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक निकालाच्या तीस दिवसांच्या आत उमेदवाराने किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने ठेवलेल्या निवडणूक खर्चाचा (जोडपत्र २६ ) हिशेब मा.खर्च निरीक्षकांकडे दाखल करणे बंधनकारक असून उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज खालीदिलेल्या तारखांना मा.निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन श्रीवर्धन निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
तथापि उमेदवाराला प्रचार मोहिमेदरम्यान किमान तीन वेळा पदनिर्देशित खर्च निरीक्षक किंवा इतर कोणत्याही निवडणूक प्राधिकाऱ्यास तपासणीसाठी विविध केलेल्या नोंदवह्या सादर कराव्या लागतील. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रत्येक तपासणीनंतर उमेदवारांची दैनंदिन निवडणूक खाते, नोंदवही तपासणीच्या दिनांकापर्यंत स्कॅन करण्यात येईल.भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक, १९३-श्रीवर्धन विधानसभा सतीश कुमार एस हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी पुढील नमूद वेळापत्रकानुसार करणार आहेत.निवडणूक खर्च निरीक्षक, १९३-श्रीवर्धन विधानसभा यांच्यामार्फत उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- पहिली तपासणी, ९ नोव्हेंबर , दुसरी तपासणी १२ नोव्हेंबर,  तिसरी १७ नोव्हेंबर स्थळ:- श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय भवन, ता.श्रीवर्धन निवडणुक खर्चाच्या उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खाते नोंदवही (भाग १ २ ३) पहिली तपासणी ९ नोव्हेंबर  रोजी मा.खर्च निरीक्षक, १९३-श्रीवर्धन यांच्याकडून होणार असल्याने ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा सर्व हिशेब उमेदवार खर्च नोंदवहीमध्ये नोंदवून स्वतः उमेदवार किंवा आपण नेमणूक केलेल्या निवडणुक प्रतिनिधी यांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणुक खर्चाची नोंदवही घेऊन उमेदवार दैनंदिनी खर्च पथकाकडे छाननी तपासणी करीता श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकिय भवन येथे पाठविण्यात यावे. जेणेकरुन सदर नोंदवह्यामध्ये काही दुरुस्त्या असल्यास त्याचे वेळीच निराकारण करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *