भारतातील छायाचित्रकारांनी काढलेली निवडक २६४ छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार !

अनिल ठाणेकर

ठाणे : ठाण्यातील नामवंत फोटो सर्कल सोसायटीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १० नोव्हेंबर  ते १७ नोव्हेंबर  दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन -विष्कार – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. भारतभरातील छायाचित्रकारांनी काढलेली कलात्मक साधारण ३२६० छायाचित्रांतील निवडक २६४ छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार असून विनामूल्य कार्यशाळादेखिल आयोजित करण्यात आल्या आहेत.हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख माननिया बाळासाहेब ठाकरे स्मारक, इटर्निटी सोसायटीजवळ, ज्ञानसाधना कॉलेज रोड, तीन हात नाका, ठाणे पश्चिम येथे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
रविवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता आणी वन्यजीव छायाचित्रकार सुयश टिळक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी मंदार सोमवंशी यांची मोबाईल फोटोग्राफी कार्यशाळा (सायंकाळी ५ ते ७), १२ नोव्हेंबर रोजी  विकास शिंदे सर  पुणे यांची टेबलटॉप व फूड या विषयावर कार्यशाळा (सकाळी १० ते दुपारी ४ ), १३ नोव्हेंबर रोजी मॉडेल आणी फॅशन या विषयावर मयूर नारंगीकर यांची कार्यशाळा (सकाळी १० ते दुपारी ४ ), १४ नोव्हेंबर रोजी हिमालयीन वन्यजीव- सागर गोसावी (सायंकाळी ६ ते ७.३०), १५ नोव्हेंबर रोजी  स्वप्नाली मठकर यांची फक्त महिलांसाठी मोबाईल छायाचित्रण कार्यशाळा सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत संपन्न होईल. १६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ छायाचित्रकार मेळावा सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून  पारितोषिक वितरण व समारोप सोहळा संपन्न होणार आहे.स्लाइड शो आणि व्याख्यानासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी 919702552233,  91 9702267676 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन फोटो सर्कल सोसायटीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *