उल्हासनगर : उल्हासनगर म्हणजे युएसए हे उघोगाचे माहेरघर असून लहानपणी येथील वस्तू खरेदी केल्याची आठवण पंकजा मुंडे यांनी सभेत केली. तसेच उधोगशील शहर गुंडा मुक्तीसाठी कुमार आयलानी यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन लाडक्या बहिणीना यावेळी केले.

उल्हासनगर टाऊन हॉल मध्ये गुरुवारी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन केले होते. हॉल मध्ये लाडक्या बहिणीने एकच गर्दी केली होती. तुम्हच्या आत्मसन्मानसाठी लाडली बहीण योजना सुरु राहणार असल्याचे मुंडे यांनी सभेत सांगितले. उल्हासनगर हे उघोगशील शहर असून युएसए नावाने प्रसिद्ध आहे.

याच शहराच्या वस्तू आम्हच्या घरात लहानपणी येत असल्याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र शहर गुंडा मुक्त करण्यासाठी कधी पाठीमागे राहणाऱ्या कुमार आयलानी यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. सभेला कुमार आयलानी, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, भाजप नेते नरेंद्र राजांनी, शिंदेसेनेचे पक्ष प्रवक्ता किरण सोनावणे, उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, भाजपचे लाल पंजाबी, डॉ प्रकाश नाथानी, लाल पंजाबी यांच्यासह रिपाई व पीआरपी पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *