रमेश औताडे

मुंबई :  भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निम्मिताने सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी सिद्धार्थ कॉलनी तरुण वर्ग संघटनेच्या वतीने दिनांक 14/4/2024 ते 30/4/2024 दरम्यान 16 दिवसांचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महापुरुषांच्या विचाराचे सामर्थ तरुणामध्ये येण्यासाठी तसेंच बुध्द आणी त्यांचा धम्म,शाहू, फुले ,यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या उन्हाळी शिबीरातून आत्ताच्या तरुणापर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

या शिबिरात सर्व वयोगटातील विद्यार्थी तरुण तरुणी यांच्यासाठी शैक्षणिक,क्रिडा,मनोरंजन,करिअर मार्गदर्शन,योगा,ध्यान,याबरोबर कोणत्याही प्रकाराचे शुल्क न आकारता क्रिकेट,फुटबॉल,कब्बड्डी,बुध्दिबळ् अश्या प्रकारे खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. या बरोबर महिला मुलीसाठी स्व सुरक्षेच्या दृष्टीने कराटे ,किक बॉक्सिंग,सहीत अनेक मैदांनी खेळाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती युवा पँथर प्रणित विनायक पगारे यांनी दिली.अधिक माहितीसाठी 98332 29995 या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *