अशोक गायकवाड
नवी मुंबई :महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक कार्यालये तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने मतदार जागरुकतेच्या स्वीप कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत आज बिंदू माधव नगर दिघा येथील महिला बचत गटांना एकत्रीत करीत मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली व २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. महिला बचत गटातील सदस्यांनी आपल्या परिचितांना मतदान करण्याचे आवाहन करावे असेही सूचित करण्यात आले.*
अशाचप्रकारे दिघा विभाग कार्यालयातील कर्मचारी व स्वच्छता मित्र यांनीही एकत्रीत येत मतदान करण्याचा निर्धार केला व मतदानाची प्रतिज्ञा सामुहिकरित्या ग्रहण केली.ऐरोली येथील चिंचपाडा भागातही मागील निवडणूकीत कमी प्रमाणात मतदान झाले अशा मतदान केंद्रांच्या परिसरात गृहभेटी देत जनजागृती करण्यात आली व मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले.वाशी येथे सेक्टर १६ येथील मुख्य चौकात उपस्थित नाका कामगारांशी संवाद साधण्यात आला व त्यांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करण्यात आले.६ नोव्हेंबर रोजी नेरुळ रेल्वे स्थानक, नेरुळ बस डेपो, सेक्टर १५ अभ्युदय बँके समोरील रिक्षा स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना एकत्र करुन मतदाना विषयी जनजागृती करण्यात आली तसेच मतदानाची प्रतिज्ञाही घेण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात ठेवलेल्या मतदार जनजागृती सेल्फी स्टँडीवर अनेक नागरिकांनी छायाचित्रे काढून आपण मतदान करणार असल्याची ग्वाही दिली व इतरांनीही मतदान करावे असे आवाहन केले.रबाळे गाव येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित डॉक्टर, कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत मतदार जागरुकता प्रतिज्ञा घेण्यात आली व सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.त्याचप्रमाणे गोठीवली गाव येथील विश्वास बहुउद्देशीय विकास संस्थेमधील महिला सदस्यांशी सुसंवाद साधत त्यांना मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, १५० ऐरोली व १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, ऐरोलीच्या स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे व बेलापूरचे स्वीप नोडल अधिकारी सहा.आयुक्त सागर मोरे यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या सहयोगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *