नांदेडमध्य अमित शहांचा हल्लाबोल

नांदेड: महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना, शरद पवारांची नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, त्यांची तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. या नकलींच्याविरोधात महाराष्ट्राच्या विकासासाठी असलींना मत द्या असे नांदेडच्या सभेत मतदारांना आवाहन करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना निवडून द्या असं आवाहन अमित शाह यांनी केलं. अमित शाह हे नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी आले होते.

अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्रात तीन नकली पक्ष एकत्र आले आहेत. नकली उद्धव सेना, शरद पवार आणि उरलेली काँग्रेस असे तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. या तिघांची ऑटो आहे, मात्र यांचे काही खरे नाही. शरद पवार हे दहा वर्षे केंद्रात मंत्री होते, पण त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा.

वातावरण बिघडले आहे असे काँग्रेसवाल्यांना वाटते, मात्र नांदेडमध्ये भाजपचेचे वातावरण आहे. ही निवडणूक मोदींना पंत्रप्रधान करण्याची आहे. प्रतापराव यांना मत म्हणजे मोदींना मत. मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था 11 व्या नंबरला सोडून गेले होते ती आज पाचव्या स्थानावर आली आहे.

खर्गे म्हणतात काश्मीरचा अन् महाराष्ट्राचा काय संबंध? पण काश्मीर हे पूर्ण देशाचं आहे, याच्या सुरक्षेसाठी नांदेडचा तरूण तयार आहे. काँग्रेसने 70 वर्षात 370 कलम हटवले नाही. दहा वर्ष मनमोहन सोनिया यांनी सरकार चालवले, तेव्हा बाहेरून लोक यायचे अन् इथे घातपात करायचे. मोदींच्या काळात पुलवामा हल्ला झाला, मात्र मोदींनी त्यांच्या घरात्त घुसून त्यांना मारले. जगाला मोदींनी मोठा संदेश दिला आहे, आमच्या वाटेला जर कुणी आला तर आम्ही त्याला सोडणार नाही

मोदींच इंजिन अन् आपली विकासाची गाडी आहे. दुसरीकडे गाडी आहे पण राहुल गांधींचं बंद पडलेलं इंजिन त्याला जोडलेलं आहे. सगळेच म्हणतात मी इंजिन आहे, पण इंजिनमध्ये एकाच ड्रायव्हरची जागा असते. ती गाडी आपल्याला विकासाकडे घेऊन जात नाही . आपली मोदींची गाडी हीच विकासाची गाडी आहे.

अशोकराव तुम्ही इकडे आले आणि बघा काँग्रेसची अवस्था काय झाली आहे. दोघे ही इथे एकत्र आलेत त्यामुळे आता चिंता नाही. सामान्य माणसांना विकासाकडे घेऊन जायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा जाहीर केली हे काँग्रेसला माहितीच नाही. मागच्या लोकसभेत  काँग्रेसची एक जागा आली होती, आता त्यांना शून्यावर आणायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *