मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धा

मुंबई, 10 नोव्हेंबर: मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेत सिक्स रेड तिसर्‍या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत मुंबईच्या अभिषेक बजाज आणि राहुल सचदेवने आगेकूच कायम ठेवली. एमएचसी बिलियर्ड्स हॉल येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सिक्स-रेड तिसर्‍या फेरीत रविवारी अभिषेकने ठाण्याच्या दानिश खानला 5-2(38-9, 10-49, 27-1, 5-38, 41-2, 39-17, 41-35 असे मोठ्या फरकाने हरवले. अन्य लढतीत राहुलने त्याचा मुंबईचाच सहकारी हसन बदामीचा 5-1(41-20, 58(58*)-10, 0-56, 42-0, 36-16, 36-23 असा पराभव केला.

15-रेड राऊंड रॉबिन फेरीत अनुराग बागरीने निखिल आहुजाचा 3-0(54-25, 61-20, 60-18) असा धुव्वा उडवला. मर्झदी कल्याणीवालाने पहिले दोन फ्रेम गमावूनही मानव पांचालवर 3-2(32-59, 1-56, 64-36, 76-69, 75-29) थरारक विजय मिळवला.

निकाल – 6-रेड (तिसरी फेरी): अभिषेक बजाज (मुंबई) विजयी वि. दानिश खान (ठाणे) 5-2(38-9, 10-49, 27-1, 5-38, 41-2, 39-17, 41-35); राहुल सचदेव (मुंबई) विजयी वि. हसन बदामी (मुंबई) 5-1(41-20, 58(58*)-10, 0-56, 42-0, 36-16, 36-23.

15-रेड (राऊंड रॉबिन): अनुराग बागरी विजयी वि. निखिल आहुजा 3-0(54-25, 61-20, 60-18); युधिष्ठिर जयसिंग विजयी वि. समय वाधवन 3-2(49-64, 67-40, 10-59, 72(41)-40, 89-23); मर्झदी कल्याणीवाला विजयी वि. मानव पांचाल 3-2(32-59, 1-56, 64-36, 76-69, 75-29); सूरज राठी (पुणे) विजयी वि. रोहन पै 3-0 (59(37)-58(46), 77-30, 62-32; सुनीत आहुजा (ठाणे) विजयी वि. जसविंदर सिंग (नागपूर) 3-1 (62-28, 37-50, 54-38, 67-9); गौरव जयसिंघानी (ठाणे) विजयी वि. आकाश ठक्कर 3-0 (90(43,22*)-8, 77-55, 57-37.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *