अनिल ठाणेकर
ठाणे : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची रविवारी सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा श्रीगणेशा रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला. रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. याचदरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी, चंदनवाडी , नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या झंझावात रॅली रायगड गल्ली भागातुन सुरू झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक (भाऊ) राऊळ, शिवसेना माजी नगरसेविका रुचिता मोरे, शिवसेनेचे हेमंत पवार भाजपचे महेश कदम , प्रकाश राऊळ आदींसह पदाधिकारी – कार्यकर्ते आणि ज्येष्ठांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रचारासाठी सहभाग झाले होते. रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील गणेश बाप्पाचे दर्शन घेत, रॅलीला सुरुवात झाली. शिवांजली सोसायटी, लक्ष्मीनारायण सोसायटी समोरून, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल चौक, हिल टॉप,ठाणे दर्शन सोसायटी, टेकडी बंगला, ओपन हाऊस चौक, पांचपाखाडी, जनरल अरुण कुमार वैद्य पुतळा,सतरंज वेफर्स चौक,उत्सव हॉटेल वरून डावीकडे, आनंद सावली सोसायटी, पांचपाखाडी,खळे कंपाऊंड, सर्विस रोड मार्गे,साबळे वाडी नितीन कंपनी चौक करून, नामदेव वाडीतील गावदेवी मंदिरात जाऊन गावदेवीचे दर्शन घेतले, तेथील गावदेवी सोसायटी मार्गे विसावा कट्टा चौक, “ठाण्याचा राजा” गोविंदा पथक कार्यालय चौक वरून डावीकडे, श्रीजी कॉम्प्लेक्स वरून नितीन जंकशनला यु टर्न मारून प्रेस्टिज पार्क, येथून साईबाबा मंदिर दर्शन करून मीनल छाया सोसायटी कडून डाव्या बाजूने तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणाहून पुढे चंद्रवदन सोसायटी, संतोषवाडी,हनुमान मंदीरातून दर्शन घेत, गणेशकृपा सोसायटी कडून गणेशवाडी, सोमय्या चाळ मार्गे पुढे रूपादेवी मंदीरात जाऊन देवीचे दर्शन घेतले, तेथून शहीद उद्यान कडून डावीकडे,पाटील वाडी मार्गे सिद्धेश्वर तलाव सर्विस रोड डी.आर.कदम यांचे कार्यालय परिसरातून रमाबाई आंबेडकर उद्यान सर्विस रोड कॅडबरी जंक्शन वरून उजवीकडून लाईफ लाईन हॉस्पिटल चौकातून सिंगनगर, हंसनगर, परेरा नगर मार्गे माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचे कार्यालय येथून एसटी वर्कशॉप मार्गे जोंधळीबाग, नूरी बाबा दर्गा रोड, रूपा देवी मंदिर चौक, संतोष साळुंखे कार्यालय,महेश कदम कार्यालय करत, गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर ठाणे महानगरपालिका चौक, कचराळी तलाव येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत ठीक ठिकाणी केळकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याचदरम्यान, स्लम मधल्या महिलांनी प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रचार करणार असे केळकरांना विश्वास दिला. प्रत्येक सोसायटी आणि मंडळाकडून केळकरांनी ओवाळणी केली असून प्रत्येक सोसायटी कडून केळकरांना मतदान करण्याचे आश्वासित केले. एकूणच केळकर यांचा प्रचाराचा झंझावात दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे.
