राघव, अहान, नील, आद्विक विजेते
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे बालदिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धेचे विविध वयोगटातील विजेतेपद मुलांमध्ये राघव संचेती, अहान जॉली, नील भंडारी, आद्विक अगरवाल यांनी तर मुलींमध्ये आध्या पाठक, आराध्या पुरो, अक्षा मंगलापल्ली, आर्या नाईक यांनी जिंकले. ७ वर्षाखालील गटात पाचव्या निर्णायक साखळी फेरीमध्ये राघव संचेतीने अपराजित शंतनू जोशीची (४ गुण) विजयी दौड रोखली आणि सर्वाधिक साखळी ४.५ गुणासह प्रथम स्थानावर झेप घेतली. परिणामी शंतनू जोशीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शर्विल मामळूस्करने (४ गुण) तृतीय, डेत्यन लोबोने (३.५ गुण) चौथा, तत्त्वा शेजवळने (३.५ गुण) पाचवा आणि मुलींमध्ये आध्या पाठकने (४ गुण) प्रथम व निकिता संदीपने (३ गुण) द्वितीय क्रमांक मिळविला.
९ वर्षाखालील मुलांमध्ये अहान जॉलीने (४ गुण) प्रथम, कृषिव गालाने (३.५ गुण) द्वितीय, अगस्त्य गुरवने (३ गुण) तृतीय, कबीर पिंगेने (३ गुण) चौथा, मार्तंड गजणेने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आराध्या पुरोने (४.५ गुण) प्रथम, आराध्या कामतने (२.५ गुण) द्वितीय; ११ वर्षाखालील मुलांमध्ये नील भंडारीने (५ गुण) प्रथम, कविर मोदीने (४ गुण) द्वितीय, अनय भांगरेने (३ गुण) तृतीय, आर्यन झाने (३ गुण) चौथा, संकीत संघवीने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये अक्षा मंगलापल्लीने (३ गुण) प्रथम, सिम्रिता बुबनाने (२ गुण) द्वितीय आणि १३ वर्षाखालील मुलांमध्ये आद्विक अगरवालने (५ गुण) प्रथम, देवांश राठोडने (३ गुण) द्वितीय, फेरद्यन लोबोने (३ गुण) तृतीय, समर्थ साळगावकरने (३ गुण) चौथा, स्मित रेवस्करने (२.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आर्या नाईकने (४ गुण) प्रथम, शहाना कृष्णनने (३ गुण) द्वितीय पुरस्कार पटकाविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सेक्रेटरी राजन राणे, क्रीडाप्रेमी विलास डांगे व चंद्रकांत करंगुटकर, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
